what to eat after c section
  • Home
  • Blog
  • सिझेरियन प्रसूतीनंतर दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि पोट कमी करण्यासाठी उपाय

सिझेरियन प्रसूतीनंतर दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि पोट कमी करण्यासाठी उपाय

By Teddyy 22 Feb 2024

आई होणे हा एक वेगळाच दिव्य अनुभव असतो!

आई होण्याचा आनंद आणि रात्रभर जागणे, प्रेमाचा वर्षाव आणि सतत डायपर बदलत राहणे…

…आणि यासोबत, कधीही न शमणारी भूक!

होय, बऱ्याचदा भूक इतकी वाढते की तुम्ही हॉलिवूडच्या ॲक्शन सीनप्रमाणे तुमच्या किचनवर तुटून पडता आणि तुम्हाला जे दिसेल ते उचलून खाता.

मातृत्व म्हणजे भावनांचा रोलरकोस्टर आहे, ‘कभी खुशी तर कभी गम’… पण तरीसुद्धा प्रसूतीनंतरचा आहार हा एक अत्यावश्यक भाग आहे. पण तुमच्या शरीराला पोषण देण्यासाठी, प्रसूतीनंतर पोटाची चरबी कमी करण्यासाठी आणि दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी काय खावे हे तुम्हाला माहीती आहे का?

या ब्लॉगमध्ये तुम्हाला सिझेरियन प्रसूतीनंतर काय खावे आणि काय नाही हे कळेल.

सिझेरियन नंतर काय खावे / प्रसूतीनंतर काय खावे?

  • फळे आणि भाज्या: हंगामी फळे लाभदायक असतात, तर पालेभाज्या, गाजर आणि रताळे यांचा आहारात नियमित समावेश केला पाहिजे.
  • धान्य: हे असे कर्बोदके आहेत जे सतत ऊर्जा प्रदान करत असतात. यामध्ये ब्राउन राइस, क्विनोआ, ओट्स, गहू आणि इतर धान्यांचा समावेश आहे.
  • लीन प्रोटीन: चिकन, मासे, बीन्स, डाळी आणि टोफू यांसारखे पदार्थ तुमच्या शरीराला मजबूत आणि कृतीशील ठेवतात.
  • हेल्दी फॅट्स: एवोकॅडो, नट्स, बियाणे, ऑलिव्ह ऑइल इ. – हे पडद्यामागील असे तारे आहेत, जे विकास आणि हार्मोन्सच्या उत्पादनामध्ये महत्वाची भूमिका बजावतात.
  • दुग्धजन्य पदार्थ: दूध, दही आणि पनीर – हे हाडांच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहेत आणि नेहमीच प्रभावी ठरले आहेत.

सिझेरियन नंतर काय खाऊ नये / प्रसूतीनंतर काय खाऊ नये?

  • प्रोसेस्ड फूड: यामध्ये बर्‍याचदा अनहेल्दी चरबी, सोडियम आणि ऍडेड शुगर असते.
  • मसालेदार पदार्थ: प्रसूतीनंतर पचनक्रिया कमी होत असल्याने मसालेदार पदार्थ त्रासदायक ठरू शकतात.
  • गॅस निर्माण करणारे पदार्थ: यामुळे सूज आणि अस्वस्थता निर्माण होऊ शकते. यामध्ये बीन्स, कोबी आणि ब्रोकोली यांचा समावेश आहे.
  • कॅफिनयुक्त पेये: कॅफिनमुळे शरीरातील पाणी कमी होऊ शकते, ज्यामुळे झोपेची समस्या उद्भवू शकते.
  • अल्कोहोल: अल्कोहोल आईच्या दुधात मिसळू शकते आणि याचा बाळावर परिणाम होऊ शकतो.

Our Products

Teddy Easy

Teddyy Easy Diaper Pants

BUY NOW

Teddy Easy

Teddyy Super Tape Diapers

BUY NOW

Teddyy Easy

Teddyy Premium Diaper Pants

BUY NOW

Our Products

बाळंतिणीला दूध येण्यासाठी उपाय : बाळंतिणीचा आहार / दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी टीप्स: सुपर फूड्स

  • मेथीचे दाणे: रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी खा. हा प्रसूतीनंतरचा उत्तम आहार आहे.
  • शतावरी पावडर: हे “गॅलॅक्टॅगॉग” म्हणून ओळखले जाते, यामुळे दुधाचे उत्पादन वाढवते. याचे सेवन तुम्ही गाईच्या दुधातून करु शकता किंवा कॅप्सूल स्वरूपात घेऊ शकता.
  • बदाम: प्रथिने, कॅल्शियम आणि हेल्दी चरबीचा चांगला स्रोत. नाश्ता म्हणून सेवन करु शकता किंवा विविध पदार्थांमध्ये याचा योग्य वापर करु शकता.
  • ओट्स: विरघळणार्‍या फायबरने समृद्ध, ओट्समुळे दुधाचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तुम्ही दालिया म्हणून खाऊ शकता किंवा स्मूदीमध्ये मिसळू शकता.
  • हिरव्या पालेभाज्या: यामध्ये पुष्कळ लोह, कॅल्शियम आणि जीवनसत्त्वे अ आणि क असतात, यांचा आस्वाद तुम्ही सॅलड, सूप म्हणून घेऊ शकता किंवा स्टर-फ्राय करुन खाऊ शकता.

निष्कर्ष

सिझेरियन बाळंतपणानंतर काळजी घेताना लक्षात ठेवा की आहार हा आपला मित्र आहे. प्रसूतीनंतरचा आहार म्हणजे असे इंधन आहे जे तुम्हाला गाडीप्रमाणे सतत पुढे चालत ठेवते. बाळाची काळजी घेण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त ऊर्जा प्रदान करते आणि प्रसूतीनंतर पोटाची चरबी कमी करण्यास मदत करते. म्हणून, आपल्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या आणि वारंवार डायपर बदलण्यासारख्या क्रिया करत रहा.

आणि इतर गोष्टी तुम्ही करु शकत नसला तरी, डायपर बदलणे हे खूपच सोपे काम आहे. Teddyy Baby Diapers प्रत्येक आईला वंदन करते! TEDDYY Diaper विविध प्रकारांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये Teddyy Premium Diaper Pants, Teddyy Premium Tape Diapers, Teddyy Wet Wipes इत्यादींचा समावेश आहे.

 

Teddyy Diaper Products Teddyy Diaper Products

Teddyy Diaper Teddyy Diaper