डिलीवरी के बाद क्या खाना चाहिए?
  • Home
  • Blog
  • गर्भवती आहार चार्ट मराठी- स्वस्थ बाळाच्या विकासासाठी

गर्भवती आहार चार्ट मराठी- स्वस्थ बाळाच्या विकासासाठी

By Teddyy 6 May 2024

‘आपल्याला मूल हवे आहे’ असे जेव्हा जोडपे ठरवते. अगदी त्या क्षणापासून जोडप्याचा आई-बाबा होण्याचा प्रवास सुरू होतो. मूल होण्यासाठी आवश्यक शारीरिक, मानसिक, आर्थिक अशा सर्व बाबींची तयारी ते जोडपे करू लागते. बरेचदा आपला आई-बाबा होण्याचा निर्णय मुलगी आपल्या आई, बहीण, मैत्रिणीशी शेयर करते. तिच्या या निर्णयाचे तिच्या आपल्या माणसांकडून सहाजिकच अगदी उत्साहात स्वागत होते.

अशातच एके दिवशी ‘तिची’ पाळी चुकते. लगोलग डॉक्टरांकडे जाऊन ‘ते’ दोघे आई-बाबा’ होणार असल्याची पक्की बातमी घेऊन जणू हवेत तरंगतच घरी पोहोचतात.

आपल्या घरात इवली पावले दुडदुडणार हे निश्चित झाल्याचे ऐकून घरच्या मंडळींच्या आनंदाला तर पारावारच रहात नाही. त्या इवल्याशा जीवाच्या आगमनाकडे आता सर्वांचेच डोळे लागलेले असतात.

या सगळ्या आनंदाच्या भरात होणाऱ्या आईच्या मनात मात्र प्रश्नांचे काहूर उठलेले असते. पुढल्या नऊ महिन्यात तिच्या शरीरात आणि मनात असंख्य बदल होणार असतात. त्याविषयी तिला घरातल्या बुजुर्ग स्त्रिया त्यांच्या गरोदरपणाच्या अनुभवाविषयी सांगत असतात. या काळात शारीरिक बादलांमध्ये सर्वात महत्वाचा बदल असतो तो म्हणजे वारंवार लघवीला जावे लागणे. मग अशा वेळी रात्री लघवीला वारंवार उठावे लागल्याने होणाऱ्या आईची पुरेशी झोप होत नाही. रात्रीची झोप बाळासाठी अत्यंत आरोगयपूर्ण असल्याने ती नीट व्हायलाच हवी.

पुढील नऊ महीने तिने गरोदरपणात काय खावे?, काय खाऊ नये? किती खावे?, कुठल्या वेळेला खावे?, कोणते कपडे घालावे?, कसे बसावे?, कसे चालावे?, झोपताना कुठल्या कुशीवर झोपावे? अशा असंख्य प्रश्नांविषयी अनेक जणी होणाऱ्या आईशी बोलत असतात.

परंतु, दिवस गेल्यानंतर गरोदरपणात नेमकी काय काळजी घ्यावी? काय खावे? काय खाऊ नये? गरोदरपणतील आहार कसा असावा. हे नेमकेपणाने आपण या लेखामधून जाणून घेणार आहोत.

गरोदरपणातील आहार कसा असावा?

गरोदर स्त्रियांनी संतुलित आहार घेणे अतिशय गरजेचे आहे. स्त्रियांचा रोजचा स्वयंपाकघरातील वावर व कामाचा धबडगा लक्षात घेता स्त्रिया इतरांसाठी रांधताना स्वत:च्या खाण्या –पिण्याकडे लक्ष देत नाहीत. मात्र गरोदरपणात मात्र स्त्रियांनी वेळेवर व योग्य प्रमाणात खायलाच हवे.

गरोदर स्त्री फॉलो करू शकतील असा गर्भवती आहार चार्ट खाली दिला आहे:

गर्भवती आहार चार्ट मराठी
सकाळी ७ वाजता 8-12 ड्राय फ्रूट्स (भिजवलेले काजू, बदाम, मनुका)
सकाळी 9 वाजता नाश्ता मूग डाळ डोसा/चीला-3 + पुदिना/नारळ चटणी
सकाळी 11 वाजता ब्लूबेरी शेक (1 कप)
दुपारी 2 वाजता दुपारचे जेवण 1.5 कप मटण बिर्याणी + काकडी कांदा रायता (½ कप)
सायंकाळी 5 वाजता रताळ्याची कोशिंबीर (200 ग्रॅम रताळे, 1 चिमूटभर चाट मसाला आणि 1 चमचे लिंबाचा रस घालून शिजवलेले) + हलका चहा (1 कप)
रात्री 8 वाजता रात्रीचे जेवण चपाती २ + हिरवी पालेभाजी
झोपण्यापूर्वी रात्री एक कप दूध
जेवण्याची वेळ काय खावे
सकाळी 6 – 7 दरम्यान अर्धा ते एक कप दूध, 4-5 बदाम आणि एक अक्रोड
नाश्ता – सकाळी 9 – 10 दरम्यान जे शाकाहारी आहेत, त्यांच्यासाठी एक वाटी दलिया आणि भाज्यांसह पोहे वा उपमा अथवा भाज्यांसह दोन गव्हाचे ब्रेड अथवा भाजी आणि पोळी किंवा गव्हाचा दलिया वा ओट्स
जे मांसाहारी आहेत, त्यांच्यासाठी एक कप दूध अथवा एक वाटी दही, एक अंडे अथवा एक वाटी पनीर
सकाळी 11 दरम्यान – मॉर्निंग स्नॅक आपल्या आवडीची दोन फळं – संत्रे, सफरचंद, केळे यापैकी
दुपारचं जेवण – 1 – 2 दरम्यान तीन पोळ्या, एक वाटी भाजी, एक वाटी आमटी, एक वाटी दही वा कोशिंबीर, एक मध्यम आकाराच्या प्लेटमध्ये सलाड
संध्याकाळचा नाश्ता – 4-5 दरम्यान एक ग्लास दूध, एक लहान वाटी भाजलेले चणे, उकडलेले अंडे अथवा उकडलेले कडधान्य
संध्याकाळी 6-7 दरम्यान दोन कोणतीही आवडती फळे (जी खाता येतील गरोदरपणात अशी)
रात्रीचे जेवण 9-10 दरम्यान तीन पोळ्या, भात, एक वाटी आमटी, एक वाटी भाजी, सलाड
रात्री झोपण्यापूर्वी 11 वाजता एक कप दूध आणि एक फळ (जे शरीराला हानीकरक नसेल)

 

स्त्रियांनी गरोदरपणात काय खावे?

  1. रोजच्या जेवणातील चौरस आहार: दररोज दुपारच्या जेवणात पोळी किंवा भाकरी, एक सुकी भाजी, कडधान्याची आमटी, लोणचे, पापड, ताक या पदार्थांचे सेवन करणे उचित ठरते. त्यानंतर भूक असल्यास वरण-भात खाण्यास हरकत नाही. धान्यामध्ये अनेक पोषक तत्व आढळतात. विटामिन, प्रोटीन आणि फायबर या तत्वामुळे आई आणि बाळाला योग्य पोषण मिळते आणि गरोदरपणात आईची तब्येतही व्यवस्थित राहाते.
  2. दूध व दुधाचे पदार्थ: गर्भवती महिलांना आपल्या होणाऱ्या बाळाच्या योग्य विकास आणि हाडांच्या मजबूतीसाठी कॅल्शियम आणि प्रोटीनची अत्यंत आवश्यकता असते. दूध हा कॅल्शियमचा सर्वांग सुंदर स्त्रोत आहे. त्यामुळे गरोदर स्त्रीने दिवसातून किमान एक ग्लास दुधाचे सेवन करायला हवे. दूधाच्या सेवनाने होणाऱ्या आईची व बाळाची हाडे मजबूत होतात. शिवाय, बाळंतपणाच्या कळा सोसण्यासाठी देखील दुधाने शक्ती मिळते. गरोदर पणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये काही स्त्रियांना दुधाच्या वासाने मळमळ, उलट्या होण्याची संभावना असते. अशा स्त्रियांनी दुधापासून तयार केलेले पनीर जरूर खावे. दूध उत्पादन आणि कॅल्शियमचे सेवन केल्याने बाळामध्ये एक्झिमासारख्या समस्या होत नाहीत.
  3. फळे: गर्भावस्थेदरम्यान फळ खाणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये असणारे पौष्टिक तत्व हे होणाऱ्या बाळ आणि आई दोघांसाठीही अत्यंत गरजेचे आहे. गरोदरपणात कोणती फळे खावीत? याबाबत स्त्रियांमध्ये काहीसा संभ्रम आढळतो. पपई सारखी उष्ण फळे गरोदरपणात खाऊ नये. मात्र प्रत्येक ऋतुनुसार मिळणारी सगळी फळे गरोदरपणात आवर्जून खायला हवीत. संत्री, मोसंबी यांसारख्या फळांमधून भरपूर प्रमाणात क जीवनसत्व मिळते. पेरू, चिकू, कलिंगड, द्राक्ष यांसारखी रसदार फळे गरोदर स्त्रियांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवतात. त्यामुळे पोटातील बाळ सुरक्षित राहते
  4. नारळ पाणी: नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हणतात. शहाळे म्हणजेच कोवळा नारळ. शहाळयाचे पाणी प्यायल्याने गरोदर स्त्रीला अपचन, पित्त होत नाही. शिवाय, त्या पाण्याने बाळाचे डोळे पाणीदार होतात.
  5. मांसाहार: तुम्ही मांसाहारी असाल तर  योग्य प्रमाणात शिजवलेले मांस प्रमाणात खाण्यास हरकत नाही. त्याशिवाय, अंडी हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. हे अमीनो ऍसिड प्रदान करते, जे मुलाच्या विकासासाठी आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, अंड्यांमध्ये कोलीनसह डझनभर फायदेशीर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.
  6. पंचामृत: सकाळी उठल्यावर दुध,दही,तूप,साखर व मध घालून तयार केलेले पंचामृत अवश्य घ्यावे.पंचामृत असिडीटी कमी करते,पचन सुधारेत, बाळाची कांती आणि स्वाथ्य चांगले राहते.
  7. सुकामेवा: रोज ५ ते १० भिजवलेले बदाम, काळ्या मनुका, खजूर, अंजीर लोहवाढीसाठी जरूर खावे. गर्भावस्थेदरम्यान महिलांना आपल्या आहारामध्ये सुकामेवा अर्थात शेंगदाणे, काजू, बदाम आणि अक्रोड याचा समावेश करून घेण्याची आवश्यकता आहे. हे केवळ पोषणच देत नाहीत तर बाळाला अनेक अॅलर्जींपासून वाचण्यासही मदत करतात. याशिवाय कोकम सरबत,लिंबू सरबत, मोरावळा, आमसूल घ्यावे त्यामुळे पित्ताचा त्रास कमी होतो.
  8. शतावरी, जेष्ठमध, अनंतमूळ, केशर घातलेले दुध नियमित घ्यावे, यामुळे उष्णतेचे विकार होत नाही आणि बाळ छान गुटगुटीत होते.
  9. लोहयुक्त पदार्थ: हेमोग्लोबिन तयार करण्यासाठी आयरनची आवश्यकता असते, जी गर्भवती महिलेसाठी महत्वाची आहे. डाळ, अंडे, पालक, इत्यादीमध्ये आयरन मिळवू शकतो.
  10. रताळे: रताळ्यामध्ये बीटा कॅरोटीन नावाचे जीवनसत्व असते, जे गर्भाच्या निरोगी विकासासाठी आवश्यक असते.
  11. मिनरल्स: गर्भावस्थादरम्यान बाळाचा विकास महत्त्वाचा असतो आणि यासाठी तुम्हाला आई म्हणून शरीरासाठी मिनरल्सची आवश्यकता आहे. म्हणूनच ज्यामधून जास्तीत जास्त मिनरलस मिळतील असे अन्नपदार्थ आहार तज्ञांच्या मदतीने जरूर सेवन करावेत. तसंच विटामिन डी ची कमतरता बाळांमध्ये हाडांशी संबंधित समस्या निर्माण करते. त्यामुळे विटामिन डी चे आईसाठी खूपच महत्त्व आहे.
  12. पाणी: नेहमीच्या तुलनेत गर्भावस्थेदरम्यान शरीराला पाणी पिण्याची जास्त आवश्यकता भासते. म्हणूनच गर्भवती महिलेने जास्तीत जास्त पाणी पित राहावे. त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखले जाते व बाळाच्या सुरक्षिततेची खात्री होते. आईच्या पोटात बाळ संपूर्णत: पाण्याच्या आवरणांमध्ये राहत असते. सतत पाणी पित राहिल्याने बाळाच्या भोवती असलेले पाण्याचे आवरण मजबूत राहाते व कालपूर्व प्रसूती टाळता येते.

गरोदरपणात रक्त वाढीसाठी काय खावे ?

  1. फायबरयुक्त अन्नपदार्थ: गरोदर स्त्रियांनी काकडी, गाजर, मुळा, बीट, रताळे यांसारखे फायबरयुक्त अन्नपदार्थ अधिक प्रमाणात खावेत. गरोदरपणात सर्रास होणारा मलावरोधाचा त्रास कमी करण्यास काकडी, गाजर मदत करते. बीट, रताळे यांसारखी कंदमुळे रक्तवाढीसाठी सहाय्यकारी ठरतात. गर्भवती स्त्रीच्या शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहिल्यास त्याचा फायदा बाळाच्या वाढीसाठी होतो.
  2. हिरव्या पालेभाज्या: गरोदरपणात शरीराला लोहाची नितांत गरज असते. रोजच्या जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश असल्यास होणाऱ्या आईला लोहाची कमतरता भासत नाही. त्याचबरोबर, रक्तवाढीसाठी देखील हिरव्या पालेभाज्या गुणकारी ठरतात.

स्त्रियांनी गरोदरपणात काय खाऊ नये?

गरोदर स्त्रीने आहार सर्वसमावेशक ठेवावा हे खरे असले तरीही, काही उष्ण पदार्थ टाळलेलेच बरे. आंबा, पपई ही फळे गरोदर बाईनी आजिबात खाऊ नयेत. कॉफी, चहा ही उत्तेजक पेये बाळाला अपायकारक ठरत असल्याने ९ महीने या पेयापासून लांब राहावे. कच्च्या भाज्या, कच्चे दूध, कच्चे अथवा अर्धवट शिजलेले अंडे किंवा मांस गरोदरपणात कटाक्षाने टाळावे.

डॉक्टरांचा सल्ला घ्या

प्रत्येक गर्भावस्था वेगवेगळी असते. गरोदर स्त्रीने आपापल्या तब्येतीनुसार डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य आहार घ्यावा. प्रत्येकीसाठी गरोदरपणाचा काळ  निरोगी आणि आनंददायी असावा.

निष्कर्ष:

गरोदरपणात स्त्रीला पडलेल्या प्रत्येक प्रश्नाला योग्य उत्तर मिळायला हवे. या प्रश्नांच्या उत्तरांतूनच तुम्हाला तुमच्या बाळाच्या संगोपनासाठी आवश्यक सल्ले मिळणार आहेत. तुमच्या बाळाच्या स्वच्छतेची जबाबदारी घेण्यास TEDDY Diaper pants तत्पर आहेत. आमच्या  TEDDY Diaper Pants च्या सहाय्याने आपल्या बाळाला द्या सुरक्षित बालपणाची अनमोल भेट !

प्रत्येक गरोदर स्त्रीचा आहार परिपूर्ण असावा जेणेकरून प्रत्येक बाळ सुदृढ होईल आणि स्त्रीला मिळेल निखळ मातृत्वाचा निर्मळ आनंद.

Teddyy Diaper Products Teddyy Diaper Products

Teddyy Diaper Teddyy Diaper