पहिल्या महिन्यातील गर्भधारणेची लक्षणे: पहिल्या 4 आठवड्यांमध्ये काय होते
प्रेग्नंन्सीच्या प्रवासाला सुरुवात करणे म्हणजे एखाद्या बहुप्रतिक्षित परंतु अनाकलनीय अशा नवीन क्षेत्रात प्रवेश करण्यासारखे आहे. सुरवातीच्या या आठवड्यांमध्ये तुम्हाला काय वाटते आहे हे तुम्हालाच सांगता येत नाही. तुमची मासिक पाळी चुकल्यापासून ते तुम्हाला थकवा जाणवणे आणि कदाचित सकाळच्या वेळी अस्वस्थ वाटणे, ही प्रेग्नंन्सीची सुरुवातीची लक्षणे रोमांचक आणि खऱ्या अर्थाने गोंधळात टाकणारी असू शकतात. तर, प्रेग्नंन्सीच्या या सुरुवातीच्या आठवड्यात काय होते आणि तुमचे शरीर पुढे येणाऱ्या अनाकलनीय अशा प्रवासाचे संकेत द्यायला कशा प्रकारे सुरुवात करते यावर बारकाईने नजर टाकूया.
गर्भधारणेच्या/ प्रेग्नंन्सीच्या पहिल्या महिन्यात काय होते?
गर्भधारणेची /प्रेग्नंन्सीची लक्षणे कधी सुरु होतात ?
गर्भधारणेच्या/ प्रेग्नंन्सीच्या पहिल्या महिन्यात, सूक्ष्म बदल केंद्रस्थानी असतात. म्हणजेच गर्भधारणेची/प्रेग्नंन्सची सुरवातीची लक्षणे दिसायला सुरवात होते. मासिक पाळी चुकणे हा गर्भधारणेच्या/ प्रेग्नंन्सीच्या शक्यतेचा संकेत असू शकतो, तर काहींसाठी मासिक पाळीऐवजी थोड्या प्रमाणात रक्तस्राव होऊ शकतो. हार्मोन्स त्यांची भूमिका बजावतात – म्हणजेच स्तन कोमल करणे आणि शक्यतो बरेच मूड बदल निर्माण करणे. पहिल्या आठवड्यात अधिकृतपणे गर्भवती नसतानाही, काउंटडाउन सुरू होते आणि येणाऱ्या तिमाहीसाठी शरीर शांतपणे स्वतःला तयार करते.
गर्भधारणेची/ प्रेग्नंन्सीची सुरुवातीची लक्षणे काय आहेत?
तुम्ही गर्भवती/प्रेग्नेंट असाल तर पहिल्या महिन्यात तुम्ही खालील लक्षणे अनुभवू शकता:
मासिक पाळी चुकणे : जर सामान्यत: तुमची मासिक पाळी नियमित येत असेल , तर सर्वात विश्वसनीय आणि निरोगी गर्भधारणेचे लक्षण म्हणजे मासिक पाळी चुकणे हे आहे.
रक्तस्राव किंवा स्पॉटिंग: इम्प्लांटेशन रक्तस्राव म्हणूनही ओळखले जाणारे हलके रक्तस्राव किंवा स्पॉटिंग, भ्रूण (प्रारंभिक अवस्थेतील बाळ) गर्भाशयाच्या अस्तराशी जोडले जात असताना होऊ शकते. परंतु गर्भधारणेदरम्यान/प्रेग्नंन्सी दरम्यान तुम्हाला कोणताही रक्तस्राव झाला तर तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे.
क्रॅम्पिंग: मासिक पाळी प्रमाणे क्रॅम्पिंग हे पहिल्या महिन्यातील गर्भधारणेचे/प्रेग्नंन्सीचे सामान्य लक्षण आहे. वाढत्या गर्भाला सामावून घेण्यासाठी शरीरात लक्षणीय बदल होत असताना हे घडते.
दुखणारे स्तन: गर्भधारणा/प्रेग्नंसी हार्मोन्समुळे स्तन मोठे, कोमल आणि दुखणारे होऊ शकतात – जसे ते मासिक पाळी येण्यापूर्वीच्या लक्षणांसारखे असतात.
अतिरिक्त लक्षणे: गर्भधारणेच्या /प्रेग्नंन्सीच्या अगदी सुरवातीच्या काळात थकवा येणे, वारंवार लघवीला जाण्याची गरज वाटणे आणि मूड बदलणे यासारखी इतर लक्षणे देखील उद्भवू शकतात.
Our Products
गर्भधारणेच्या/प्रेग्नंन्सीच्या पहिल्या महिन्यातील सामान्य लक्षणे:
गर्भधारणेच्या/ प्रेग्नंन्सीच्या पहिल्या महिन्यातील काही अन्य लक्षणे:
- पाठदुखी आणि डोकेदुखी
- धाप लागणे
- बद्धकोष्ठता
- मूळव्याध
- अपचन आणि छातीत जळजळ
- त्वचेला खाज येणे, हातांना मुंग्या येणे, हात सुन्न होणे
- पायात पेटके (क्रॅम्पिंग)येणे
- योनीतून स्त्राव
- योनिमार्गाचा दाह (योनिमार्गाची जळजळ)
गर्भधारणेच्या/ प्रेग्नंन्सीच्या 1-2 आठवड्यात काय होते?
जरी गर्भधारणा/प्रेग्नंन्सी आताच सुरू होते, तरी पारंपरिक मानकांनुसार आपण अधिकृतपणे गर्भवती नाही. डॉक्टर सामान्यतः गर्भधारणेची/प्रेग्नंन्सीची गणना आपल्या शेवटच्या मासिक पाळीच्या पहिल्या दिवसापासून 40 आठवड्यांसाठी करतात. तथापि,अंडोत्सर्ग(ओव्हुलेशन) सुमारे 14 दिवसांच्या आसपास होतो, त्यामुळे या वेळी गर्भधारणा होण्याची शक्यता असते. म्हणून, आपले डॉक्टर प्रत्यक्ष गर्भधारणेपूर्वीही या आठवड्यासह आणि पुढील आठवड्याचा सुद्धा आपल्या गर्भधारणेत समावेश करतात. हे आश्चर्यकारक वाटू शकते, परंतु आपण पहिल्या आठवड्यात खरोखरच गर्भवती नाही.
दुस-या आठवड्यापर्यंत, तुमची मासिक पाळी संपत असेल आणि अंडोत्सर्ग (ओव्हुलेशन) जवळ येत असेल तर आठवड्याच्या शेवटी यशस्वी संभोग केल्याने जेव्हा अंडी आणि शुक्राणूंचा संयोग होतो तेव्हा गर्भधारणा होऊ शकते.
गर्भधारणेच्या/प्रेग्नंन्सीच्या 3-4 आठवड्यांमध्ये काय होते?
गर्भधारणेच्या/प्रेग्नंन्सीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत, शुक्राणू आणि अंडी(स्पर्म अँड एग) स्त्रीबीजवाहक नलिकेमध्ये (फॅलोपियन ट्यूबमध्ये) एकत्र होतात, जीवनिर्मितीसाठी एक-कोशिकीय बीजांड (झायगोट) तयार करतात. हे बीजांड (हा झायगोट) आपण आणि आपला जोडीदार या दोघांचेही आनुवंशिक पदार्थ घेऊन जातो, जे भविष्यातील आपल्या बाळाच्या विकासाची पायाभरणी करते. स्त्रीबीजवाहक नलिका (फॅलोपियन ट्यूब) खाली जात असताना, ते वाढत्या पेशींच्या समूहात विभाजित होते.
जेव्हा तुम्ही 4 आठवडे गर्भवती/प्रेग्नेंट असता,तेव्हा अल्ट्रासाऊंड (गर्भधारणा चाचणी) गर्भाशयाच्या अस्तरात वसलेल्या एका लहान बिंदूसारखी दिसणारी एक लहान काळी गर्भावस्थेची थैली दाखवेल. विशेषतः चार आठवड्यांनंतर, भ्रूण किंवा बाळ खसखस बियाणांपेक्षाही (पॉपी सीड्स) लहान, जवळजवळ सूक्ष्म असते. हे पूर्णपणे आश्चर्यकारक नाही का?
जीवन निर्माण करण्याच्या आनंदात स्वतःचे पोषण करणे विसरू नका. फक्त होणारी आई म्हणूनच नव्हे तर तुम्ही एक अतुलनीय स्त्री आहात म्हणून स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ द्या. तुमच्या हृदयाचा ताल ऐका, शांत चिंतनाचे क्षण घ्या आणि स्वतःला प्रेम आणि पाठबळ द्या. तुमच्यामध्ये घडणाऱ्या बदलांवर लक्ष ठेवा आणि कदाचित, शक्य झाल्यास, बाळांच्या नावाचा देखील विचार करण्यास सुरुवात करा.